X

Retro Walking or Walking Backwards!

Physical And Mental Health Benefits Of Walking Backwards!

Walking backwards, also known as retro walking, is a new trend in exercise that is now considered as an excellent physical activity.

It can be done on floor or on ground or it can be done as water walking in a swimming pool.

It has multiple health benefits including physical, mental, and cognitive health and overall mental and physical fitness.

It helps in rehabilitation and pain relief and calorie burning and in improving cardiovascular fitness.

***

Physical health benefits:

Improves Balance & Coordination: Engages different muscle groups and improves awareness of body position.

Strengthens Leg Muscles:  Works the hamstrings, calves, and glutes more than forward walking.

Reduces Joint Impact: Reduces stress on the knees and helps relieve knee pain and knee rehabilitation.

Improves posture: Reduces strain on the lower back and helps develop upright posture.

These benefits are more pronounced if you retro walk in a swimming pool than on ground or a treadmill.

***

Cognitive and neurological benefits: It activates different neural pathways, improves cognitive flexibility and memory and improves brain function.

Improves mental faculties and awareness: Improves focus and attention, enhancing mental awareness.

***

Improves Athletic Performance: Improves core muscle strength and stability and helps improve running speed.

Rehabilitation and Pain Relief: Strengthens knee, leg and back muscles helps in rehabilitation of knee injuries, arthritis and post surgery recovery.

Reduces lower back pain: Strengthens muscles that support the spine and helps reduce lower back pain.

***

Burns more calories: Requires more effort and hence burns more calories.

Improves cardiovascular health: Provides good aerobic workout even at lower speeds.

***

Tips to Get Started:

Start on a flat, safe surface, track or a treadmill or in a swimming pool.

Warm up with normal forward walk for five to ten minutes.

Use handrails if necessary, for backward walk.

Focus on your posture, keep the back straight while walking backwards.

Use short, controlled steps to maintain balance.

Focus on controlled movements to avoid falls.

Swing your arms naturally to maintain coordination.

Start with only a few steps backward initially.

Increase to one or two minute backwards walking once you learn to walk backwards and increase the

distance and time gradually.

Walk backwards for 10 to 15 minutes in one session.

***

Also read the article ‘Walking To Be Slim And Healthy!’ on this website.

***

रेट्रो वॉकिंग किंवा वॉकिंग बॅकवर्ड्स किंवा उलटे चालणे आणि त्याचे फायदे!

रेट्रो वॉकिंग किंवा वॉकिंग बॅकवर्ड्स म्हणजे उलटे चालणे.

हा एक थोडा अवघड पण उत्तम एक्सरसाईज आहे.

हा एक्सरसाईज आपण ग्राउन्ड वर, घरात किंवा सर्वात सुरक्षित आणि सर्वात उत्तम, पाण्यात स्विमिंग पूल मध्ये करू शकतो.

ह्या एक्सरसाईज मुळे शारीरिक, मानसिक, आरोग्य आणि फिटनेस तसेच कॉग्निटिव्ह (आकलन क्षमता) हेल्थ वर खूप चांगला परिणाम होतो.

तसेच ह्या एक्सरसाईज मुळे इंजरी रिहबिलिटेशन, वेदना मुक्ती आणि कॅलरी बर्निंग आणि कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ वर ही उत्तम परिणाम होतो.

***

शारीरिक आरोग्यावरील परिणाम:

शरीराचा बॅलन्स (संतुलन) आणि कोऑर्डिनेशन (समन्वय) सुधारतो: शरीरातील वेगळे मसल (स्नायू) ग्रुप वापरले जातात आणि शरीराच्या पोझिशन (स्थिती) चा अवेअरनेस (जाणीव) सुधारतो.

पायाच्या मसल्स ची ताकद वाढते: मांडी च्या मागचे हॅमस्ट्रिंग आणि पायाच्या मागील काफ मसल्स आणि सीट चे ग्लुटियल मसल्स सरळ चालण्याच्या एक्सरसाईज पेक्षा अधिक वापरले जातात आणि अधिक सशक्त होतात.

पायाच्या सांध्यांवरील इम्पॅक्ट कमी होतो: त्यामुळे गुडघ्यांवरील ताण कमी होऊन गुडघे बरे होण्यास मदत होते आणि तेथील वेदना कमी होतात.

पोस्चर सुधारते: कंबरेच्या मसल्स (स्नायू) वरील ताण कमी होऊन पोस्चर अपराइट (ताठ) होण्यास मदत होते.

हे फायदे रेट्रो वाटर वॉकिंग मध्ये अधिक चांगले आणि अधिक लवकर झालेले दिसतात.

***

कॉग्निटिव्ह आणि न्यूरॉलॉजिकल परिणाम: असे चालल्याने मेंदू मध्ये वेगळे न्यूरल पाथवेज निर्माण होतात आणि कॉग्निटिव्ह फ्लेक्सबलिटी (आकलन लवचिकता), मेमरी (स्मरणशक्ती) आणि मेंदू ची कार्यक्षमता सुधारते.

मेंटल फॅकल्टी (मानसिक कार्यक्षमता) आणि अवेअरनेस (जाणीव, जागरूकता): फोकस आणि अटेंशन (एकाग्रता) आणि मेंटल अवेअरनेस (मानसिक जागरूकता) सुधारतात.

***

ॲथलेटीक परफॉर्मन्स सुधारतो. पायाच्या, पाठीच्या मसल्स ची ताकद वाढते आणि त्यामुळे पाठ, गुडघे ह्यांचे आरोग्य सुधारते आणि तेथे होणाऱ्या आजारातून किंवा सर्जरी मधून लवकर रिहॅबलिटेशन होऊ शकते.

पाठीच्या, कंबरेच्या मसल्स बळकट होतात आणि त्यामुळे पाठ कंबरदुखी बरी होऊ शकते.

***

उलटे चालण्याचा वेग कमी असला तरी ह्या एक्सरसाईज मध्ये शरीर अधिक कॅलरीज जाळते आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

कमी वेगामध्ये सुद्धा हा एक्सरसाईज चांगली एरोबिक ॲक्टिव्हिटी, म्हणजेच चांगला कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाईज होऊ शकतो आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

***

हा एक्सरसाईज सुरू करण्यासाठी काही टिप्स:

हा एक्सरसाईज फ्लॅट जमीन, किंवा ग्राउंड वर किंवा ट्रेडमिल वर किंवा सर्वात उत्तम म्हणजे स्विमिंग पूल मध्ये छाती एवढ्या पाण्यात करावा.

आधी पाच ते दहा मिनट सरळ, नॉर्मल चालत वॉर्म अप व्हावे.

गरज असेल तर साईड ला हॅन्ड रेल्स असलेले ठिकाण शोधावे. 

पाठी मागे चालताना पोस्चर वर लक्ष ठेवावे, पाठ सरळ ठेवावी, वाकू नये.

छोट्या, नियंत्रित स्टेप्स घेत चालावे, म्हणजे आपण पडणार नाही, ह्याची काळजी घ्यावी. पाण्यात असे चालणे अधिक सोपे जाते.

सुरुवातीस अगदी थोड्या स्टेप्स नी सुरुवात करावी, हळू हळू स्टेप्स वाढवत न्याव्यात.

एकदा प्रॅक्टीस झाली की एक सेशन मध्ये 10 ते 15 मिनटे चालावे.

Dr. Nitin Gupte: For over three and half decades, I have helped Indian people, including specialists doctors, get slim and healthy for a lifetime, not only at our Slimming Center in Pune but also at their homes, all over the world, in our ‘Distance Program’!
Related Post