X

Diabetes Reversal!

??????????

Is Diabetes Reversal Even Possible?

Diabetes is of two types, Type 1 and Type 2 diabetes.

Of these Type 1 diabetes is an autoimmune condition in which the body does not produce insulin.

That is why Type 1 diabetics need to take insulin lifelong and thus it cannot be reversed.

Some of the Type 2 diabetes patients can be managed or even sent into remission with healthy lifestyle changes including healthy diet, regular exercise and weight loss.

Research indicates that around 30 to 50 per cent of newly diagnosed Type 2 diabetics can achieve good blood sugar control with lifestyle interventions (heathy diet, exercise, and weight loss) alone.

Studies show that losing 5 to 10 per cent of body weight can significantly improve blood sugar control, and some individuals can even achieve remission viz. normal blood sugar without medication.

Remission vs. Reversal: Remission means that blood sugar levels are within a normal range without the need for medication, but it does not mean the condition is cured. If lifestyle changes are not maintained, blood sugar levels can rise again.

Misleading Advertising: Some advertisers may use the term diabetes reversal to promote products or programs that claim to cure diabetes. These claims are often exaggerated or lack scientific backing. Be wary of products that promise quick fixes, miracle cures, or require you to stop prescribed medications without medical supervision.

Always consult your doctor before making significant changes to their treatment plan or trying new products. Medical professionals can provide guidance based on individual health needs.

While the condition pre diabetes is reversible, the claims of diabetes reversal are highly questionable.

Summary: While managing and potentially putting Type 2 diabetes into remission is possible for some people, the idea of a universal or permanent cure is often overstated by advertisers. Always consult your doctors before trying a new treatment on your own.

Also read the article ‘Preventing Diabetes’ on this website.

 


 

डायबीटिस रिव्हर्सल: सत्य की असत्य?

डायबीटिस दोन प्रकारचे असतात.

डायबीटिस टाइप 1 आणि डायबीटिस टाइप 2.

ह्या पैकी डायबीटिस टाइप 1 हा ऑटोइम्यून आजार असून त्यामध्ये शरीर इन्सुलिन निर्माणच करत नाही.

त्यामुळे हा आजार असलेल्या लोकांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावे लागते आणि ह्या आजाराचे रिव्हर्सल हाऊच शकत नाही.

तर डायबीटिस टाइप 2 असणाऱ्या लोकांमधील काही लोकांचा डायबीटिस हेल्दी आहार, नियमित एक्सरसाईज आणि वजन कमी करू शकणाऱ्या हेल्दी जीवनशैली बदल करण्याने मॅनेज किंवा रेमिशन मध्ये सुद्धा जाऊ शकतो.

रेमिशन म्हणजे ब्लड शुगर्स केवळ उत्तम जीवनशैली बदलांनी औषधांशिवाय नॉर्मल राखणे.

ह्या विषयीच्या रिसर्च मध्ये असे आढळून आले आहे की नव्याने डायबीटिस झालेल्या लोकांमध्ये 30 ते 50 टक्के लोकांना केवळ अधिक चांगला आहार, नियमित एक्सरसाईज आणि वजन कमी करू शकणारी जीवनशैली स्वीकारण्याने त्यांच्या ब्लड शुगर च्या लेव्हल्स नॉर्मल राखता येतात.

रिसर्च मध्ये असे ही आढळून आले आहे की केवळ 5 ते 10 टक्के वजन कमी करण्याने डायबीटिक लोकांच्या ब्लड शुगर्स मध्ये सिग्निफिकन्ट सुधारणा होते तर काही लोकांचा डायबीटिस रेमिशन मध्ये ही जाऊ शकतो, म्हणजे ब्लड शुगर्स औषधांशिवाय ही नॉर्मल राहू शकतात.

पण औषधांशिवाय डायबीटिस  रेमिशन मध्ये जाणे म्हणजे डायबीटिस बरा किंवा रिव्हर्स होणे नाही, जर का ह्या डायबीटिस रेमिशन मध्ये गेलेल्या लोकांनी जीवनशैली मधील बदल सोडून दिले, तर त्यांच्या बल्ड शुगर्स पून्हा वाढू लागतील.

ह्याचाच अर्थ डायबीटिस कायम स्वरूपी बरा होणारा आजार नाही.

म्हणजेच डायबीटिस रेमिशन होऊ शकते, ते सुद्धा काही लोकांमध्ये, सर्वांमध्ये नाहीपण रिव्हर्सल मात्र होऊ शकत नाही.

म्हणूनच सरसकट सर्वांचे डायबीटिस रिव्हर्सल चा दावा करणाऱ्या उपचारांवर प्रश्नचिन्ह उभे राहते.

तुमच्या डायबीटिस चे आणि तुमचे पर्सनलाईज्ड उपचार केवळ तुमचे डॉक्टरच करू शकतात.

त्यांचा सल्ला घेता असे कोणतेही रिव्हर्सल उपचार सुरू करणे योग्य नाही.

सुयोग्य आहार, एक्सरसाईज आणि वजन कमी करण्याने प्री  डायबीटिस रिव्हर्स होऊ शकतो डायबीटिस नाही.

प्री डायबीटिस किंवा डायबीटिस दोन्ही साठी तुम्ही सुयोग्य आहार, एक्सरसाईज आणि वजन कमी करण्याने फायदाच होईल, तरी डायबीटिस साठी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्या बरोबरच वजन ही कमी करा, त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल.

 

Dr. Nitin Gupte: For over three and half decades, I have helped Indian people, including specialists doctors, get slim and healthy for a lifetime, not only at our Slimming Center in Pune but also at their homes, all over the world, in our ‘Distance Program’!
Related Post